Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. ते आपल्या मनोगतात म्हणाले की आपल्याकडे असणाऱ्या विविध कौशल्याचा लाभ सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, महाविद्यालयाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना सुचवाव्यात, विविध मार्गाने समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत जेणे करून महाविद्यालयाच्या विकासासाठी लाभ होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संलग्न राहून महाविद्यालयाच्या विकासासाठी कटिबद्ध रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राध्यापक राम पवार उपस्थित राहिले.आपल्या भाषणात ते म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे राजदूत म्हणून काम करून महाविद्यालयाची ओळख समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पंचवीस वर्षापूर्वी च्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले की, महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाची सोय झाल्यामुळे आपण जीवनात पुढे जाऊ शकलो अशा भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे  विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील यांनी केले. त्यांनी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्याचा उद्देश सांगितला.

कार्यक्रमास कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, डॉ. अमित सुपले तसेच माजी प्रा. आर. व्ही पाटील, प्रा. व्ही. व्ही पाटील प्रा. आर. आर. मगदूम व प्रा. पी. एस. डिकुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. शिल्पा साळुंखे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील  सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)