Header Ads

Loknyay Marathi

समाज परिवर्तनासाठी मानवी मूल्यांचे जतन आवश्यक: डॉ. संजय कांबळे

समाज परिवर्तनासाठी मानवी मूल्यांचे जतन आवश्यक: डॉ. संजय कांबळे

सांगली: मानवी मूल्यांचे जतन केल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. मानवी मूल्ये ही चांगला नागरिक घडवू शकतात. त्यामुळे समाजामध्ये मानवी मूल्यांना अनन्यसाधारण महत्व असून प्रत्येक व्यक्तीने मूल्यांचे संवर्धन व पालन केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी केले.

येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय अंतर्गत आयोजित मानवी मूल्ये या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
          
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रा च्या व्याख्यात्या म्हणून प्रा. श्रीमती जयश्री पाटील म्हणाल्या की नम्रता, जबाबदार, प्रामाणिकपणा, देशभक्ती, संवेदनशीलता, विवेक शीलता सर्वधर्मसमभाव, श्रम प्रतिष्ठा या मानवी मूल्यांचे सर्वांनी पालन केल्यास देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागण्यास मदत होईल.
        
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी आपल्या संदेशात मानवी मूल्ये मानवी विकासाची नांदी असल्याने अल्पवयीन मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी मानवी मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले. कला व वाणिज्य प्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनी मानवी मूल्ये देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे मत मांडले. स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले. अग्रणी महाविद्यालय समितीचे समन्वयक प्रा. सतिश कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा. अमोल कुंभार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. मंगेश गावीत यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)