Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे स्पर्धेत वर्चस्व

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे स्पर्धेत वर्चस्व
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने शनिवार दिनांक 18 /12 /2021 रोजी देवचंद कॉलेज, अर्जुननगर (कोल्हापूर) या ठिकाणी झालेल्या आंतर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले. 

यामध्ये रितेश म्हैसाळे व अनिरुद्ध निपाने हे अनुक्रमे 102 kg व 67 kg वजन गटांमध्ये सुवर्णपदक विजेते ठरले. या खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. वल्लभ जूगळे या विद्यार्थ्याने 55 kg वजन गटात सिल्वर मेडल तर आदर्श पट्टेकरी याने  73 kg गटामध्ये ब्रॅाझ मेडल पटकविले. 

सदर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी सत्कार व कौतुक केले.सदर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. ए. ए. तुपे व प्रा. रूपाली कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)