Header Ads

Loknyay Marathi

अभिजितदादा कदम यांच्या स्मृतीस अभिवादन

अभिजितदादा कदम यांच्या स्मृतीस अभिवादन

सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की, भारती विद्यापीठाच्या कला, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठीअभिजितदादा कदम यांचे मोलाचे योगदान होते. शिक्षणाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे असे त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. आज भारती विद्यापीठ सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे हे त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होताना दिसत आहे.

या कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील आणि कला व वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ. नितीन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)