Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी

सांगली;२६ सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शाहू महाराज जयंती सांस्कृतिक विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 


मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारसरणीमुळे महाराष्ट्रात फार मोठे सामाजिक बदल घडून आले. विशेषतः सामाजिक न्यायाच्या बाबतीत शाहू महाराजांचे कार्य अतुलनीय आहे. याप्रसंगी कला विज्ञान व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल प्रा. सौ. जे. डी. हाटकर, प्रा. डॉ. एन. व्ही. गायकवाड, प्रा. एस. ए. कांबळे, प्रा. एन. नाटके यांनी केले. या प्रसंगी विविध विभागाचे विभाग प्रमूख शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)