वाचन चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
वाचन चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेऊन सरकारने फार चांगला निर्णय घेतला असून त्यामुळे वाचकांना आणि ग्रंथालयांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः वाचन चळवळीशी निगडित असणाऱ्या सर्वच घटकांच्या दृष्टीने विचार केला तर आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे, असे मत प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालय व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी माजी राष्ट्रपती मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत ग्रंथपाल प्रा. जे. डी. हाटकर यांनी केले तसेच वाचन दिनाचे महत्व विशद केले. त्या म्हणाल्या की महाविद्यालयात सुरू असलेल्या ई-वाचन कट्ट्याच्या तरुणाईने लाभ घ्यावा.
प्रास्ताविक करताना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, महाविद्यालयीन तरुणाईमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हीच खरी शिक्षण व्यवस्थेची भूमिका असते. त्यामुळे इथून पुढच्या काळात वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा आदर्श घेऊन अध्ययन व संशोधन करावे. त्याबरोबरच तरुणांनी मोठी स्वप्ने बघून ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावेत.
या प्रसंगी कला व वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे, ग्रंथपाल प्रा. जे. डी. हाटकर प्रा. अंकुश सरगर प्रा. डॉ विकास आवळे त्याचबरोबर विविध विभागातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
Post a Comment