भारती विद्यापीठात बहुविद्याशाखिय लिड कार्यशाळा संपन्न
भारती विद्यापीठात बहुविद्याशाखिय लिड कार्यशाळा संपन्न
संवाद, शिष्टाचार आणि कौशल्यानेच व्यक्तिमत्वास परिपूर्णता: डॉ. उषा बंदे
सांगली: दि. ८ डिसेंबर
संवाद, शिष्टाचार आणि कौशल्यानेच व्यक्तिमत्वास परिपूर्णता प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन सिमला येथील डॉ. उषा बंदे यांनी केले. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लिड कॉलेज उपक्रमा अंतर्गत आयोजित आंतर विद्याशाखीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेत, भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज, डेंटल, नर्सिंग, फिजिओथेरपी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लॉ आणि सांगली तसेच मिरज, म्हैशाळ येथील सर्व कला, विज्ञान महाविद्यालयाचे समन्वयक आणि प्रत्येकी १० विद्यार्थी असे एकूण १८० विद्यार्थी सहभागी झाले.
याप्रसंगी कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. स्नेहा कटके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यशाळेच्या मुख्य वक्त्या आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अड्व्हांस्ड स्टडीच्या फेलो डॉ. उषा बंदे यांनी संवाद कौशल्य आणि मॅपिंग-द-मार्जिन्स अर्थात वंचितांच्या क्षमतावाढी संदर्भात सामाजिक उत्तरदायित्व आणि प्रेरणा यांचा दोन सत्रामध्ये परामर्श घेतला.
Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)










Post a Comment