yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात युवक बिरादरी (भारत) नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात युवक बिरादरी (भारत) नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात युवक बिरादरी (भारत) नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 

सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली आणि युवक बिरादरी (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने 'नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा' संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. व्ही. ए. रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

      सदर कार्यशाळेचे उद्घाटन कार्यशाळेचे प्रमुख प्रवक्ते युवक बिरादरी (भारत) कार्यशाळा समन्वयक मा. नागेंद्र राय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.आर. सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.अरुण जाधव, डॉ. रूपाली कांबळे, डॉ. वंदना सातपुते, प्रा.अमोल कुंभार, प्रा.अथर्व जोशी, प्रा. सुशांत कराळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवक बिरादरी (भारत)  अभिरूप युवा सांसद प्रारूपाचे सादरीकरण केले. 

    याप्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख प्रवक्ते मा.नागेंद्र राय मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रत्येक युवकांनी आत्मविश्वास,शिस्त, संघभावना इत्यादी विचार अंगीकारले पाहिजे. नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे तर जबाबदारी, सकारात्मक दृष्टीकोन आणि सामाजिक जाणीव असलेले एकत्रित संगम आहे. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. लोकशाही मूल्ये, संविधानिक आदर्श व जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करून लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करता येतात.

तसेच या कार्यशाळेमधून मिळालेले ज्ञान आणि प्रेरणा विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि सामाजिक आयुष्यात निश्चितच उपयोगाची ठरतील असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

       यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,  नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, आत्मविश्वास व दूरदृष्टी विकसित करण्यासाठी 

तसेच विकासासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा  विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात असे मत व्यक्त केले.

     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.वंदना सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अथर्व जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल कुंभार यांनी केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)