yuva MAharashtra हक्क,अधिकारासह कर्तव्याचे भान ठेवा:धनंजय जोशी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

हक्क,अधिकारासह कर्तव्याचे भान ठेवा:धनंजय जोशी

हक्क,अधिकारासह कर्तव्याचे भान ठेवा:धनंजय जोशी




    सांगली: सात भारतीय भाषांत संविधानाचे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे अभिवाचन करीत, भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 'हमारा संविधान, हमारा स्वाभिमान' अंतर्गत विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आणि आचरणातून संविधान साकारण्याची शपथ घेतली.

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी मा.धनंजय जोशी(माजी मुद्रांक अधिकारी- जिल्हाधिकारी कार्यालय सांगली),पत्रकारितेचे अभ्यासक प्रा.संजय ठिगळे(कार्यवाह- महाराष्ट्र साहित्य परिषद,सांगली) प्रा.श्रीकृष्ण मोहिते (सचिव-भारती विद्यापीठाचे ग्रामीण विकास प्रतिष्ठान,सांगली) आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे आदि मान्यवर उपस्थित होते.

      यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी कु.समृद्धी हासबे(संस्कृत), कु.दिव्या शिंदे (मराठी),फैज पेंढारी(हिंदी), हर्षवर्धन शेळके (इंग्रजी), निरंजन गवळी (कन्नड), बिलाल शेख(उर्दू), डॉ.नरेश पवार(अहिराणी) आणि कु.राधिका धनसिंग मिझार (नेपाळी)या भाषांत संविधान प्रस्तावनेचे अभिवाचन केले.

     यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.जोशी मार्गदर्शन करताना म्हणाले की, जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये देणारा तत्ववेत्ता थॉमस जेफरसन, अमेरिकन राज्यघटना आणि ब्रिटिश कायदा यांच्या आधारे भारताची राज्यघटना तयार झाली असली तरीही तिचे प्रारूप संपूर्णपणे वेगळे आहे. याचे श्रेय डॉ. आंबेडकरांनी मसुदा समितीतील सर्व सदस्यांना दिले आहे, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढ्या आज उरलेल्या नाहीत. पण त्यांनी प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य आजच्या पिढ्यांसाठी मिळवले याचे भान वर्तमानातील पिढ्यांनी ठेवले पाहिजे.

    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणखांबे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,जबाबदारीची जाणीव ठेवण्यासाठी, संविधान हे “भारतीयांनी भारतीयांनाच” अर्पण केले असल्याने, त्याच्या आचरणाची जबाबदारी ही आज स्वातंत्र्याचे लाभ घेणाऱ्या पिढ्यांचीच आहे,असे प्रतिपादन केले. यावेळी २६/११ रोजी मुंबईवर  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना व मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

     राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.रुपाली कांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना सातपुते आणि एन.सी.सी.विभाग प्रमुख डॉ.महेश कोल्हाळ यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.अमित सुपले आणि प्रा. ए. एल. जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.मंगेश गावित यांनी केले तर आभार डॉ.वंदना सातपुते यांनी मानले.

       या कार्यक्रमास वरिष्ठ व  कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)