डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संगणक शास्त्र कार्यशाळा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संगणक शास्त्र कार्यशाळा संपन्न
सांगली : दि. १०/११/२०२५
२१ व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांचा वेध घेऊन संगणक शास्त्रातील आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य "संगणक शास्त्र विभाग" भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रेरणेने व कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम साहेब व उपक्रमशील प्राचार्य प्रा. डॉ. विवेक रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील संगणकशास्त्र विभागात "Angular JS" या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शनपर वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले. या व्याख्यान व वर्कशॉप साठी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सौ. तेजश्री पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.
सौ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक वेब डेव्हलपमेंटमध्ये Angular JS चे महत्त्व, त्याचे उपयोग आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे त्याचे कार्य कसे चालते हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत प्रश्नोत्तर सत्रातही सक्रिय सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विवेक रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागप्रमुख श्री. अमोल वंडे व सहकारी प्राध्यापक व समन्वयन सौ. प्रणाली पाटील आणि सौ. अश्विनी पाटील यांनी केले. संगणकशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक वेब तंत्रज्ञानाबद्दल नवीन जागरूकता आणि प्रेरणा निर्माण होण्यास मदत झाली आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)



Post a Comment