डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात पदव्युत्तर विभागाचा स्वागत समारंभ
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात पदव्युत्तर विभागाचा स्वागत समारंभ
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील एम.एस.सी. भाग एक सूक्ष्मजीवशास्त्र विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. ए. आर.सुपले, विभाग प्रमुख प्रा.श्रीमती बी. के. भावीकट्टी, प्रा. डॉ.जी.वी.माळी व विभागातील सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक व कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमापूजनाने आणि वृक्षरोपटयांना पाणी घालून झाले. कार्यक्रमाचे आयोजन सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील एम.एस.सी. भाग दोन च्या विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी बोलताना प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी सद्यस्थितीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा परिपूर्ण वापर करण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. सुपले यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रातील बदल याबाबत आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक पर भाषणात बोलताना श्रीमती भावीकट्टी यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व व स्वरूप विशद केले. त्याचबरोबर सूक्ष्मजीव विभागाअंतर्गत राबविले जाणारे विविध उपक्रम आणि इतर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. प्राध्यापक डॉ.जी. व्ही. माळी यांनी स्वयंम कोर्सेस तसेच इनोवेशन, इनक्युबेशन, स्टार्टअप, आय.पी.आर., पेटंट, संशोधनाचे पदव्युत्तर शिक्षणातील महत्त्व सांगून विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती महत्त्वाची असल्याबाबत मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रेयस शेठे व कु. अमृता जाधव यांनी केले. यावेळी नवोदित विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय व ओळख करून देऊन विविध गुणदर्शन केले. यावेळी कु. प्रज्वल कांबळे व कु. तनुजा वरपे यांना अनुक्रमे मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर म्हणून गौरवण्यात आले. यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहकारी प्राध्यापक आरिफ मुलाणी,सपना वेल्हाळ, प्रिया पवार, समृद्धी पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार कु.तृप्ती यादव हिने केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment