डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक चिमणी दिन उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक चिमणी दिन उत्साहात साजरा
सांगली: येथील डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक चिमणी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रम समन्वयक व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा कुंभार, प्रा. नलेश बहिरम प्रा. रूपाली माने, प्रा. प्रियांका जाधव आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे संदेशपर भाषणात म्हणाले की, आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यातुनच चिमण्यांचे अस्तित्व जपले जावे, म्हणून 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, दिवसेंदिवस चिमण्यांच्या संख्येमध्ये घट होत आहे. चिमणी अभ्यासकांच्या मते, गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या तब्बल ८५ टक्क्यांनी घटली आहे. चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे चिमणी हा सामान्यपणे मनुष्य वस्तीच्या शेजारी राहणारा पक्षी आहे. मात्र गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये गाव तसेच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगले उभी राहिली. मोठ-मोठ्या इमारती आणि घरे बांधण्यासाठी वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. वृक्षांची कत्तर करण्यात आल्यामुळे आणि सिमेंटच्या मजबूत इमारती उभारण्यात आल्याने चिमण्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तंत्रज्ञान वाढले, आज आपण ५ जी च्या दिशेने वाटचाल करत आहोत. या मोबाईलमधून निघणाऱ्या रेडियशनमुळे अनेक पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहेत. या पक्ष्यांच्या यादीत चिमणीचा देखील समावेश होतो. रेडियशनमुळे चिमणीचा केवळ मृत्यूच होत नाही तर त्यांच्या प्रजनन क्षमतेवर देखील गंभीर परिणाम होतो. त्यामुळे दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होत आहे. चिमण्या कमी होण्याची कारणे व चिमण्यांच्या संवर्धनाचे उपाय यावर समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यातुनच चिमण्यांचे अस्तित्व जपले जावे, म्हणून 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांनी केले, आभार प्रा. प्रियांका जाधव यांनी मानले. यावेळी प्राणी शास्त्री विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment