yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्व. राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे  आपल्या संदेशात  म्हणाले  की,                

देशात दरवर्षी २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस साजरा केला जातो.  याच दिवशी माजी   पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म झाला. त्यांच्या  स्मरणार्थ  हा दिवस सद्भावना दिवस आणि अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सर्व जातीधर्मांच्या लोकांनी एकत्र राहून राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, बंधुता, सामाजिक ऐक्य, प्रेम आणि आपुलकी निर्माण करावी, हाच उद्देश सद्भावना दिवसाचा आहे. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे यांनी सर्वांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा दिली.    
               
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, डॉ. रूपाली कांबळे, प्रा. रोहिणी वाघमारे, डॉ. वर्षा कुंभार, डॉ. दादा नाडे, डॉ. मारुती धनवडे, डॉ. वंदना सातपुते, डॉ. तॄशांत लोहार, प्रा. अमोल कुंभार, प्रा. नलेश    बहिराम तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)