डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना डॉ. पोरे म्हणाले की, 'अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून समाजाला क्रांतिकारी विचार दिला. वास्तववादी लेखनीने अण्णा भाऊंनी मराठी वाचकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवले. या लोकशाहीराने महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.' या प्रसंगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. संजय ठिगळे व कनिष्ठ विभागातील मराठीचे प्राध्यापक प्रा. शंकर पाकले यांनी अण्णा भाऊ साठे यांचे जीवन व कार्य या विषयी माहिती सांगितली.
यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने केले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment