महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्ती योजनेबाबत वेबिनार
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्ती योजनेबाबत वेबिनार
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात वेबिनारचे ऑनलाईन प्रेक्षपण
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना बाबतची माहिती देण्याकरिता राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, संस्था प्रतिनिधी यांच्यासोबत मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील (मंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य) यांनी वेबीनारच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक योजनांचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील सर्व मुलींना १००% टक्के मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित सर्व मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे, त्यामुळे या योजनांचा फायदा राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या वेबिनार ऑनलाईन प्रेक्षपणाचे नियोजन महाविद्यालयातील प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, शिष्यवृत्ती विभागाचे समन्वयक प्रा. एन. डी. पवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment