Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न  


सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कणसे म्हणाले की, भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी गोरगरिबांची मुलं शिकावीत म्हणून शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्य लोकांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळेच आज सामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांची असंख्य मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून डॉ. पतंगराव कदम साहेबांनी प्रत्येक घटक शाखेत सुसज्ज इमारतींसह भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा पुरेपूर उपयोग करून विद्यार्थ्यांनी करिअर घडविले पाहिजे.
        
यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपला परिचय करून दिला आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 
     
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कनिष्ठ विभागाचे विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आर. एस. काटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. व्ही. एन. डुबल यांनी केले.

यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya Sangli)