Header Ads

Loknyay Marathi

पोरी जरा जपून : डॉ.कदम महाविद्यालयात प्रबोधन

'पोरी जरा जपून' डॉ.कदम महाविद्यालयात प्रबोधन:


सांगली, दिनांक 3 ऑक्टोबर 2023-

येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लेडीज असोसिएशनच्या वतीने 'पोरी जरा जपून' या विषयावर प्रसिद्ध लेखिका व कवयित्री प्रा. विजया मारोतकर, नागपूर यांचा प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.प्रा.विजयाताई यांनी आपल्या काव्यमय कार्यक्रमातून- मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, सुरक्षा ॲप डाऊनलोड करा, बेसावध असलेल्या लेकिंनो सावध व्हा असा संदेश दिला. अश्लीलता आवर गं पोरी, 'फुलपाखरू होईल म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते' या कवितेतून मुलीचे जीवन तर 'ठिगळ' कवितेतून आईचे कष्टमय जीवन दाखवून दिले. त्याचबरोबर आहाराविषयी महत्त्व सांगताना मुलींनी तिरंग्याच्या रंगाच्या आहाराचे सेवन करावे असे सांगितले. मुलींनी कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, सासरी सर्वांना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा,संयम ठेवावा,माहेर व सासर यात समन्वय साधून नाती टिकवावीत असेही त्यांनी उदाहरणातून सांगितले आणि जाता -जाता शेवटी मुलींनी समाजात कसे वागावे याविषयी त्यांनी सर्व विद्यार्थिनींना प्रतिज्ञा दिली.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी.कणसे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व इतर मान्यवर यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. या कार्यक्रमास दैनिक लोकमतचे श्री.हणमंत पाटील व श्री.अशोक डोंबाळे यांची विशेष उपस्थिती होती.श्री.हणमंत पाटील यांनीही मुलींना मार्गदर्शन केले व असे उपक्रम राबवीत असल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. डी. जी.कणसे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करीत असताना मुलींना महाविद्यालयात त्यांचे वर्तन कसे असावे याविषयी उपदेश केला.प्रा.डॉ.रुपाली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले व.रोहिणी वाघमारे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.सुपले, प्रा. टी. आर.सावंत,सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)