Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात  
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विक्रम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. योगासनांचे महत्त्व सांगताना डॉ. कणसे म्हणाले की, योग केल्याने मन, बुद्धी आणि शरीराला उर्जा मिळते. त्यामुळे आपण दिवसभर प्रसन्न राहतो. केवळ योग दिनाच्या दिवशी योग न करता वर्षभर रोज योगासनांचा व प्राणायामाचा सराव करणे गरजेचे आहे. 
     
या वेळी  विक्रम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित प्राध्यापकांनी अनेक योगासनांचा सराव केला.  या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रुपाली कांबळे, प्रा. अमर तुपे यांनी केले होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)