yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा


भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी लेडीज असोसिएशन मार्फत फॅन्सी ड्रेस व नृत्य स्पर्धा यांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. महाविद्यालयाच्या माजी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. जया कुर्‍हेकर,प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महाविद्यालयात शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक उपक्रम खूप महत्त्वपूर्ण आहेत असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कलागुणांना वाव मिळवून देणे हे अत्यावश्यक आहे, असे मत व्यक्त केले.


या कार्यक्रमात फॅन्सी ड्रेस,वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी प्रो. डॉ.जया कुरेकर व प्रा. स्वाती पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


फॅन्सी ड्रेस स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक- पूर्वा कारेकर (11 वी सायन्स) 
द्वितीय क्रमांक -गायत्री भगत  (11 वी सायन्स) 
तृतीय क्रमांक नेहा जाधव (11 वी.एम.एल.टी )

वैयक्तिक नृत्य स्पर्धा निकाल 
प्रथम क्रमांक-माधुरी कुलकर्णी (एम.एस.सी.)
द्वितीय क्रमांक-तनवी कटारिया (बी. एस.सी.1)
तृतीय क्रमांक-प्राची मेंदणे (बी. एस.सी.1)
 
सामूहिक नृत्य स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक -अंजुम शिकलगार आणि ग्रुप-(बी.एस.सी.भाग 3)
द्वितीय क्रमांक -अंजली आणि ग्रुप (बी.एस.सी.भाग 3)
 तृतीय क्रमांक -श्रेया आणि ग्रुप( 11 वी.एल.एम.टी.)
चतुर्थ क्रमांक -आफरीन आणि ग्रुप  (बी.एस.सी.भाग 3)


या कार्यक्रमासाठी कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, उपप्राचार्य प्रो. डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, विद्यार्थिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन लेडिज असोसिएशन समन्वयक प्रा. भारती भाविकट्टी यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. वासंती बंडगर यांनी केले तर आभार प्रा.जयश्री हाटकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)