Header Ads

Loknyay Marathi

ढोलीडा या तालावर डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात रंगला गरबा

'ढोलीडा’ या तालावर डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात रंगला गरबा


सांगली : दि.३०/०९/२०२२ भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये या वर्षी नवरात्री आणि हस्त नक्षत्राच्या निमित्त पारंपारिक हादगा आणि गरबा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या काळात महाविद्यालयाच्या कार्यक्रमावर निर्बंध होते, त्यामुळे ह्या वर्षी विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या नुकत्याच निवृत्त झालेल्या प्राध्यापिका सौ. विद्याराणी पाटील यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. या कार्यक्रमांच्या निमित्ताने फँन्सी ड्रेस स्पर्धा आणि गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यानंतर प्रमुख पाहुण्या प्रा. सौ. विद्याराणी पाटील यांनी सर्व विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या लेडीज असोसिएशन तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन व सूत्र संचालन प्रा.भारती भावीकट्टी यांनी केले. तर आभार प्रा.वंदना सातपुते यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, सर्व महिला प्राध्यापिका आणि शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. स्पर्धांचे नियोजन प्रा. वर्षा कुंभार, प्रा. शिल्पा साळुंखे यांनी केले.
 
प्रथम पारंपारिक हादगा साजरा केला. विद्यार्थीनीनी फेर धरून हादग्याची गाणी सादर केली. विद्यार्थिनींसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये एकूण १३ विद्यार्थिनीनी भाग घेतला. यापैकी विजेत्यांची नांवे पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक –लक्ष्मी बबल्लेश्वर –बी.एस्सी.भाग-१
द्वितीय क्रमांक – तृप्ती भांबुरे - बी.एस्सी.भाग-१
तृतीय क्रमांक – नाजीया बागवान – १२ वी.कला


यानंतर विद्यार्थिनींची रास गरबा व दांडिया स्पर्धा पार पडली. यामध्ये एकूण ७ गटाने भाग घेतला होता. स्पर्धा गटामध्ये आयोजित केली होती. यामध्ये जिंकलेल्या गटांची नांवे पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक ढोलीडा ग्रुप - बी.एस्सी.भाग-१
अंजली परीट 2) समृद्धी शिंदे 3) ऋतिक कांबळे 4) नेहा पोतदार 
द्वितीय क्रमांक – स्वीट हार्ट ग्रुप – १२ वी.
श्रेया लोखंडे 2) ज्योती पवार 3) मंजू नाटेकर 4) नाजीया बागवान .
तृतीय क्रमांक – सनेडो ग्रुप - बी.एस्सी.भाग-१
तृप्ती भांबुरे 2) अनुराधा जाधव 3) वैष्णवी पुराणिक 4) श्रावणी मलपे 
              
या दोन्ही स्पर्धांचे चे परीक्षक म्हणून प्रा. कु. भारती भावीकट्टी व प्रा. कुु. सुलभा तांबडे यांनी काम पहिले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)