डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वाचन प्रेरणादिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वाचन प्रेरणादिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे थोर शास्त्रज्ञ तथा भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन, भित्तिपत्रकाचे अनावरण , पुस्तक प्रदर्शन, सामुहिक वाचन आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महणाले की, 'मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारतात वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. भारत महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात रूजवला होता. कारण भारतात तरूणांची संख्या जास्त आहे. आजच्या तरूणांनी विविध क्षेत्रांत संशोधन करून देशाचे नावलौकिक वाढवले पाहिजे . डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. डॉ. कलाम नेहमी म्हणायचे की, चांगले पुस्तक हे शंभर मित्रांसारखे असते. म्हणून शाळा- महाविद्यालयातील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या दिवशी वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो.'
यावेळी महाविलयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी.आर. सावंत, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. अरूण जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय कमीटीचे प्रा. डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. ए. एम. सरगर, डॉ. विकास आवळे, ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment