Header Ads

Loknyay Marathi

व्यक्तीच्या जडणघडणीत मातेचे संस्कार मोलाचे : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे

व्यक्तीच्या जडणघडणीत मातेचे संस्कार मोलाचे : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
सांगली : माता ही जन्मदात्री असली तरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती दिशादर्शक असते. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत मातेचे संस्कार मोलाचे असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मातोश्री बयाबाई कदम होत. बयाबाईंनी केलेल्या संस्कारामुळेच डॉ. पतंगराव कदम सारख्या विभूती घडल्या असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.

येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील सोनसळ सारख्या ग्रामीण भागात राहून मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण दिले. शिक्षणाला संस्काराची जोड मिळाली की उत्तम नागरिक घडतो हे त्या काळातही या मातेला ज्ञात होते. बयाबाईंच्या संस्काराची बीजे रुजल्यामुळेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात डॉ. पतंगराव कदम यांनी देदीप्यमान कार्य केले.  

या वेळी कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, डॉ. कृष्णा भवारी, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके, प्रा. नरेश पवार यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)