Header Ads

Loknyay Marathi

समाजात लिंगभाव सवेंदनशीलता आणि समानता रुजणे गरजेचे : डॉ. कपिल ललित

समाजात लिंगभाव सवेंदनशीलता आणि समानता रुजणे गरजेचे : डॉ. कपिल ललित
सांगली: समाजात ज्यावेळी स्त्री सक्षमीकरण होईल  त्याच वेळी स्त्री पुरुष समानता प्राप्त होईल. त्यासाठी लिंग सवेंदनशीलता रूजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. कपिल ललित यांनी व्यक्त केले.  येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय अंतर्गत आयोजित 'लिंग सवेंदनशीलता आणि समानता' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
          
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राच्या प्रमुख व्याख्यात्या प्रा. डॉ. सौ.अर्चना जगतकर  म्हणाल्या की, कौटुंबिक हिंसाचार समाजामध्ये वाढले असून ते रोखायचे असतील तर सर्वांनी स्त्रीला सन्मान द्यावा त्यासाठी स्त्री, पुरुष समानता असणे ही काळाची गरज आहे.
          
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. डी. जी. कणसे आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, 'आजही महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांमधून लिंग सवेंदनशीलतेवर विचार मंथन झाले पाहिजे त्यामुळे स्त्री-पुरुषातील वैचारिक मतभेद दूर होऊन समाजात जागरूकता निर्माण होईल असे मत व्यक्त केले. 
  
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सौ. पी.एम. पाटील यांनी केले.  कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनी आभार मानले. अग्रणी महाविद्यालय समितीचे  समन्वयक प्रा. सतिश कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर डॉ. सौ.वर्षा कुंभार, प्रा. अमोल कुंभार,प्रा. ए. ए. पोळ, प्रा. नंदकुमार नाटके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश  गावीत आणि प्रा. नलेश बहिरम यांनी  केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)