Header Ads

Loknyay Marathi

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्रमसंस्कार शिबिर महत्वाचे. प्रा.अभय जायभाये

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्रमसंस्कार शिबिर महत्वाचे. प्रा.अभय जायभाये


सांगली: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साठी श्रमसंस्कार शिबिर अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. अभय जायभाये यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना अनौपचारिक शिक्षण काय असते आणि आपल्याला समाजापासून कसे मिळते याची जाणीव होते. भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन समारंभ मौजे डिग्रज ता. मिरज येथे पार पडला त्या प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. 


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सिकंदर जमादार (मा. अध्यक्ष सांगली जि. म. सहकारी बँक लि. सांगली) यांनी विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, व्यक्तिमत्वविकास याविषयी मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे हे होते. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी आपले राष्ट्रीय सेवा योजनेनितील स्वंयसेवक राष्ट्र उभारणीसाठी मोलाचं योगदान देत आहेत आणि अनेक आपत्कालीन परिस्थितीत समाज उपयोगी कार्य करत आहे असे म्हणाले. पुढे ते म्हणाले शिबिराच्या निमित्ताने आपण विविध विषयांवर व्याख्यानं आयोजित करतो त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान अवगत करण्यास मदत होते.


याप्रसंगी मौजे डिग्रज गावातील श्री. विशाल चौगुले (जि. प. सदस्य सांगली) श्री. रावसो शिवगोंडा पाटील (अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस मौजे डिग्रज) सौ. गितांजली इरकर (सरपंच), श्री. प्रमोद लांडे (उपसरपंच ), श्री. सतीश सुर्गोंडा पाटील (पोलिस पाटील), श्र्री. बाळासो रावसो पाटील (अध्यक्ष सेवा सोसा. लि. डिग्ररज) तसेच सर्व ग्रामस्थ आणि पत्रकार उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख प्रा. प्रभा पाटील, कला वा वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी.  आर. सावंत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव. कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे,  प्रा. रुपाली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सदस्य डॉ. ए. एम सरगर, प्रा. वाय. सी. धुळगंड, प्रा. डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. व्ही. ए. सातपुते, तसेच माविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. व्हीं. एस. कुंभार यांनी केले व आभार प्रा. रुपाली कांबळे यांनी मानले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)