इ-संसाधनांचा वापर काळाची गरज : डॉ. डी. बी. सुतार
इ-संसाधनांचा वापर काळाची गरज : डॉ. डी. बी. सुतार
सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त ‘इनफ्लिबनेट एन-लिस्ट व इ-संसाधनांचा वापर’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
सदरच्या वेबिनार चे प्रमुख मार्गदर्शक शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर नॉलेज रिसोर्स सेंटर मधील डेप्युटी लायब्ररीयन डॉ. डी. बी. सुतार यांनी आपल्या मार्गदर्शनात इ-संसाधने म्हणजे काय ते सांगून त्यांचे महत्त्व व वैशिष्ट्य विषद केले. इ-संसाधनांचा वापर आपल्याला २४×७ करता येतो. जगाच्या पाठीवर तुम्ही कोठे आहात याला महत्त्व नाही. कोठूनही कोणतेही डॉक्युमेंट पाहू शकता. एकाच वेळी अनेक दस्तावैजांची तुलना करू शकता. इ-संसाधनामध्ये लवचिकता असते. त्यामध्ये तुम्ही इतर कागदपत्रांसह सुधारणा करणे, पुनर्रचना करणे आणि एकत्र करणे सोपे आहे. त्यांची साठवणूक करणे सोपे आहे. इ-संसाधनांमुळे वेळ, ऊर्जा, जागा, पैशाची बचत होते. इ-संसाधनांमध्ये मुक्त प्रवेशाचे फायदे सांगितले. डीजीटल मटेरीयल कसे डाऊनलोड करायचे ते सांगितले. महाविद्यालयाने इनफ्लिबनेट एन-लिस्ट ची मेंबरशीप घेतलेली आहे. याचा वापर करावा कसा करावा याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. त्यांनी वाचन साहित्यांचे प्रकार सांगितले. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट कोणकोणते असतात ते सांगितले. इंटरनेट वरील फ्री- इ-डेटाबेस यामध्ये DOAJ, EBSCO, math.com, Google Scholar, world digital library, e-prints, NDL, Shodhganga, इ-पाठशाला, इ-अध्ययन, इ-पाठ्य, युजीसी मॉक्स, इ-बालभारती, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश सर्च कसे करायचे याचे प्रात्यक्षिकासह उदाहरणे दिली. त्याचबरोबर इंटरनेटवर सर्चिंग करताना कशी काळजी घ्यावी हेही सांगितले.
प्रा. टी. आर. सावंत यांनी कोरोना महामारीमुळे जगावर तसेच शिक्षण क्षेत्रावर अनिष्ट परिणाम झाला आहे. वाचकांना त्यांना हवी असलेली माहिती मिळत नाही, त्यामुळे इंटरनेटवरून डीजीटल माहिती सर्च करून अभ्यास करावा असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ मेनेजमेंट कौन्सिलचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे सर यांनी कोविड काळात सर्व वाचकांनी डीजीटल माध्यमाचा वापर करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस ग्रंथपाल प्रा. सौ. जे. डी. हाटकर यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्याचबरोबर ग्रंथपाल दिनाचे महत्त्व विषद केले व डीजीटल माध्यमे का गरजेची आहेत हे विषद केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग प्रमुख डॉ. ए. आर. सुपले, सायन्स विभाग प्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयाबाहेरील इतर सर्व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. वेबीनार साठी टेक्निकल सहाय्य प्रा. अमोल वंडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ग्रंथालय समितीचे संयोजक डॉ. एस. एन. बोऱ्हाडे यांनी मानले व सुत्रसंचालन डॉ. व्ही. बी. आवळे यांनी केले.
Post a Comment