Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजित दादा कदम जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजित दादा कदम जयंती साजरी


भारती विद्यापीठाच्या सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कै. अभिजित दादा कदम यांची जयंती मा. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.

उपस्थितांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे यांनी केले. प्रारंभी अभिजित दादा कदम यांच्या प्रतिमेस विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमास वरिष्ठ, कनिष्ठ व व्यवसायिक शिक्षण विभागातील विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले.