शिवाजी महाराज प्रेरणा देणारे युगपुरुष - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
शिवाजी महाराज प्रेरणा देणारे युगपुरुष -
प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणा देणारे युगपुरुष आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन देशातील तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे असे मत प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे व अँड. अशोक वाघमोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
स्वागतपर भाषणात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, महाविद्यालयीन तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घ्यावा.
मार्गदर्शनपर भाषणात डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही समाजाच्या विकासाला चालना देणारे आहेत. विशेषतः महाराजांचे कृषी विषयक विचार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चालना देणारे आहेत.
या प्रसंगी पोपटराव पवार, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. तानाजी सावंत, विविध विभागातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. उपस्थितांचे आभार ग्रंथपाल प्रा. जे. डी. हाटकर यांनी मानले.
Post a Comment