yuva MAharashtra भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यात डॉ. दादा नाडे यांचा गौरव - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यात डॉ. दादा नाडे यांचा गौरव

भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यात डॉ. दादा नाडे यांचा गौरव



सांगली: भारती विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व तरुण संशोधक डॉ. दादा नाडे यांना “Research Excellence Award–2026” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, प्रख्यात लेखक व पत्रकार राजदीप सरदेसाई, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम,भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी मंत्री मा. डॉ. विश्वजीत कदम, तसेच शालेय विकास समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तसेच डॉ. के. डी. जाधव, डॉ. एस. एम. सगरे (सहकार्यवाह, भारती विद्यापीठ, पुणे),भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कुलसचिव डॉ. विवेक सावजी, तसेच हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुहास मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठातील दहा हजारांहून अधिक प्राध्यापकांमधून फक्त चार जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वात कमी वयाचे संशोधक म्हणून डॉ. नाडे यांची निवड झाली. त्यांनी केलेले संशोधन, राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनकडून मिळालेले ६३ लाखांचे संशोधन अनुदान आणि नासाशी संबंधित रेडिओ टेलिस्कोपवरील संशोधन प्रकल्पाचे कार्य यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला.

या वेळी डॉ. नाडे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.)विवेकानंद रणखांबे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले,  सहकारी प्राध्यापक आणि कुटुंबीयांचे आभार मानले. “या यशामध्ये माझी पत्नी डॉ. राणी पवार यांचे मोठे योगदान आहे,” असेही त्यांनी सांगितले.या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून डॉ. दादा नाडे यांचे अभिनंदन होत आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)