Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संविधान दिन साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संविधान दिन साजरा


सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे आपल्या मार्गदर्शनपर संदेशात म्हणाले की, 'भारतीय संविधानाने आपल्याला लिहिण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आणि जात, धर्म, वंश, पंथ विसरून सर्व भारतीयांना 'आम्ही भारताचे लोक' ही नवी ओळख दिली. अखंड भारत देशाला जोडण्याचं काम भारतीय राज्यघटनेने केले आहे. आपल्या देशाची राज्यघटना ही  भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. जगातील सर्वश्रेष्ठ घटनांमध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेचा समावेश होतो. या राज्यघटनेचा प्रत्येक भारतीयांनी आदर  राखला  पाहिजेच त्याचबरोबर संविधानाप्रती सदैव जागरूक असले पाहिजे.'
    

या प्रसंगी 26/11  रोजी मुंबईवर  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद  जवानांना व मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
   
या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे यांनी केले. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना सातपुते यांनी उद्देशपत्रिकेचे वाचन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, ज्युनिअर विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.एस.डी. पाकले, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)