Header Ads

Loknyay Marathi

लोकविकासामध्ये डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे योगदान मोलाचे - प्रा.प्रदीप पाटील

लोकविकासामध्ये डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे
योगदान मोलाचे - प्रा.प्रदीप पाटील


सांगली - ग्रंथालय चळवळ ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करुन पद्मश्री डाॅ.एस.आर. रंगनाथन यांनी लोकविकासामध्ये मोलाचे योगदान दिले,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा.प्रदीप पाटील यांनी केले
         

येथील डाॅ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये ग्रंथालय चळवळीचे जनक डाॅ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डी.जी.कणसे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, माणूस समृद्ध होण्यासाठी वाचनाची नितांत आवश्यकता आहे.व्यक्त होण्यासाठी लेखन हे अत्यंत उपयुक्त आहे. लेखन आणि वाचनाने जीवनाकडे बघण्याची दृष्टी व्यापक होते.संस्कृती,साहित्य,चरित्रात्मक लेखन अशा अनेक विषयांवरचे वाचन जगण्यातला आनंद वाढवते.इथूनपुढच्या काळात आपण वाचन तर केले पाहिजेच, पण आपल्या जीवनातील वेगवेगळ्या अनुभवावर आणि आपल्या आवडत्या विषयांवर आपण लेखन केले तर समाजाला ते निश्चित उपयोगी पडेल.


या कार्यक्रमास माजी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.श्रीकृष्ण मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागप्रमुख प्रा.जयश्री हाटकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता कक्ष प्रमुख डॉ. ए. आर. सुपले यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)