डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कणसे म्हणाले की, आपल्या महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यात प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे भाग घेऊन कौशल्य विकसित करावे. या वेळी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा प्रेरणादायी जीवनपट त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संस्था आणि महाविद्यालयाची प्रगती कशी होत गेली याबद्दल थोडक्यात आढावा घेतला.
तीन दिवस चाललेल्या या उद्बोधन कार्यक्रमात काही तज्ज्ञ प्राध्यापकांनी महाविद्यालयातील विविध कोर्सेस, शिष्यवृत्त्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, एन.सी.सी., लँग्वेज लॅब, क्रीडांगण, सांस्कृतिक विभाग, एन.एस.एस. विभाग याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच महाविद्यालयाने घालून दिलेले नियम आणि शिस्त यांचे पालन केले पाहिजे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे व कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. तानाजी सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नॅक समन्वयक डॉ. अमित सुपले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. तर आभार प्रा.अमोल कुंभार यांनी मानले.
या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व प्रथम वर्षात शिकणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment