जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे यश
जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे यश
जागतिक एडस् दिनानिमित्त, जिल्हा एडस् नियंत्रण व प्रतिबंध कक्ष, सांगली यांच्यातर्फे दि. ३/१२/२०२२ रोजी जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एच्. आय. व्ही. व एडस् असा सदर स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेमध्ये येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील एम्. एस्सी. भाग १ मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत प्रथमेश प्रभाकर गावडे व प्रशांत प्रकाश शिंदे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना ए .आर. टी. केंद्राचे डॉ. कुलकर्णी, डॉ. शिंदे यांच्याहस्ते प्रमाणपत्रे देवून सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. डी. जी. कणसे सरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. सदर विद्यार्थ्यांना सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भारती. का. भावीकट्टी, प्रा. ए. ए. मुलाणी व प्रा. एस्. ए. भेडसे यांनी मार्गदर्शन केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment