डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवातील लोकनृत्य स्पर्धेत अजिंक्य
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवातील लोकनृत्य स्पर्धेत अजिंक्य
सांगली : शिवाजी विद्यापीठाच्या ४१ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे लोकनृत्य प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
हा महोत्सव महागाव (ता. गडहिंग्लज) येथील गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच पार पडला. त्यामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून विजेते ठरलेले प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत नऊ संघांमधून लोकनृत्य कला प्रकारात डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने प्रथम क्रमांकासह अतिशय मानाचा समजला जाणारा 'सरदार बाबासाहेब माने' लोकनृत्य फिरता चषक पटकावला.
महाविद्यालयाने यावर्षी दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध 'दिवली' लोकनृत्याचे सादरीकरण केले. कु. सानिका मिटके, प्रतिक्षा खोत, हिना शेख, रोहिणी भोसले, प्रतिक्षा नलावडे, वैदेही पवार, अमृता चौगुले, श्रेया कांबळे, आकांक्षा कोळेकर आणि ऋतुजा साळुंखे यांचा या नृत्यामध्ये सहभाग होता. डोक्यावर पेटती समई घेऊन या कलाकारांनी अत्यंत रोमहर्षक सादरीकरण केल्यामुळे प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकली. याशिवाय रांगोळी या कला प्रकारात कु. मोहिनी विजय गायकवाड हिने तृतीय क्रमांक मिळविला.
सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवातही लोकनृत्य व पथनाट्य स्पर्धेत महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक तर मराठी वक्तृत्व स्पर्धेत कु. धीरज धनाजी थोरात याने द्वितीय क्रमांक मिळविला होता. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे संस्थेचे कार्यवाह ना. डॉ. विश्वजीत कदम, शालेय समिती अध्यक्षा विजयमाला कदम, विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, यांनी अभिनंदन केले. यावेळी विज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. गायकवाड आदी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment