Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिलांचा सत्कार संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिलांचा सत्कार संपन्न
दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिला प्राध्यापक व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन, भारती विद्यापीठ ,सांगली येथील मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी सर्व महिलांचा सत्कार केला व त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे नियोजन लेडीज असोसिएशनच्या प्रमुख प्रा. सौ. भारती भाविकट्टी, प्रा. सौ. विद्या पाटील व प्रा. सौ. जयश्री हाटकर यांनी केले. प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.