Header Ads

Loknyay Marathi

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर


मुंबई : महाराष्ट्रातील बारावी आणि दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांच्या माहितीनुसार बारावीची परीक्षा 23 ते 29 मे या दरम्यान, तर बारावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे सुरक्षिततेची काळजी घेतली जातेय. कोरोनामुळेच यंदा परीक्षांचं तसेच  शाळेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. अशात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाहीत यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं. मात्र आता स्वतः शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर केलेली आहे.