yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

सांगली: डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे जननायक बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

        यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य (डॉ.) डी. जी. कणसे यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य (डॉ.) कणसे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक न्यायासाठी दिलेला संघर्ष भारतीय इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या जीवनकार्यातून तरुण पिढीने अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रेरणा घ्यावी.

     या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. शिकंदर जमादार, प्रा. तानाजी सावंत तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रुपाली कांबळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)